मुके झाले शब्द

तुला पाहताच ओठांवर
ओसंडणाऱ्या शब्दांनी
आज मात्र मौन धरलय
कारण तुला हि असे
शब्दात ओसांडताना
त्यांनी आज पाहिलंय…..

Advertisements

ओघळणार्‍या अश्रूसवे

ओघळणारी तु सुद्धा दिसावीस

कधीतरी…..अन्

ओघळणार्‍या आठवणी सुद्धा

थोड्या तुझ्या थोड्या माझ्या….

काही लाल काही गुलाबी

ओलसर ओठांवर ओथंबलेल्या……

…… विश्वकमल

हरवलेले माझे बाबा

वाट बघतेय मी रोज
रोजच्या सारखीच, बाबांच्या
चॉकलेट अन् खाऊची
पण न सांगताच गेलेला बाबा माझा
आलाच नाही कधी परतून
कोणी म्हणतं गावाला गेला
कोणी म्हणतं देवाघरी गेला
सारेजन मला समजावू लागले
खोटी आश्वासनं देत राहीले
पन हरलेला बाबा माझा
आलाच नाही कधी परतून
अंगा खांद्यावर खेळवणारा
थोडासा खोडकर स्वभावाचा
आठवतो मला तो हाताच्या
झुल्यावर झुला झुलवायचा,
आठवणींचा पुर नुसता
वाहत होता बाबांच्या शोधात
दिवसा मागून दिवस सरले
हाती काहीच न उरले
शोधत राहीले आठवत राहिले
बाबांना उरात भरुन घेत राहिले
गुंतलेले प्रश्न सोडवत राहिले ,
पन बाबा माझा
आलाच नाही कधी परतून
हरवल्या बाबांना मी शोधत राहिले
कधी जत्रेत तर कधी बाकी मुलांचे हट्ट
पुरवणार्‍या बाबांना पाहून समाधान मा

नून

मनातल्या मनात मारते मिठी घट्ट

तुझ्याशिवाय डोंगर पेलत डोईवरला
आई, बहिणी- भावांना सावरत गेले
मी जरी झेलले लाख अडचणी पन
कौतुकाचे दोन शब्द ऐकविण्यास तु नाही
बाबा वाट तुमची पहात राहिले….
बाबा वाट तुमची पहात राहिले….
पन बाबा तुम्ही मात्र
आलाच नाही कधी परतून…….
आलाच नाही कधी परतून…….
कोमल गुंडू हुद्दार
बेळगाव

तू आहेस तरी कोण ?

माणूस म्हणावं पण माणसासारखी
माणसातली तुला विश्रांती नाही

मशिन जरी म्हणावे तुजला पण
तुझ्यातला प्रेमळ स्वभाव मानत नाही

जगत असला तू जरी दुसऱ्यासाठी
जगणे हे कसले जगून जगत नाही

कुठे आहे जायचे ठरव तुझेच तू

जिंकणे कुणा कुणाशी, स्पर्धा इथे नाही

रुसून घे थोडं हसून घे या एकाच जन्मी

नको पाहू स्वप्ने इथे पुनर्जन्म नाही

विसरुन सार्‍या चिंता विरुन जा आनंदात

सारेच येथे सुःख दुःखाचे प्रवासी प्रवाही

सारेच येथे सुःख दुःखाचे प्रवासी प्रवाही

वाहत जा वार्‍यासंगे तु,मी येथे सारेच प्रवाही

……कोमल गुंडू हुद्दार

बेळगांव

बिघडलं कुठे…..?

आजची पिढी स्वच्छंदी स्वतंत्र विचार वृत्ती करणारी झाली आहे. यांना सर्वकाही मनासारखं झालं पाहिजे. मुख्यत्वे लग्नासाठी स्वतंत्रपणे निवड करु पाहतात आणि ते कुठेतरी योग्यच आहे कारण हल्ली डिवॉर्सचे प्रमाण खुपच वाढलेले आहे तर दुसऱ्या लग्नासाठी संख्या वाढत आहे. पण पहिले ते पहिलेच असतं ना? कारण पहिल्या लग्नात जखमा खाऊन दुसरं लग्न करताना विचार करालच ना? असो…..!

आपली भारतीय संस्कृती योग्यच आहे कि योग्य वयानुसार योग्य वेळेत लग्न झाली पाहिजेत. पण आताच्या शैक्षणिक जगात लग्न सुद्धा खुप अभ्यासून घेत आहेत. कारण लग्न जेवढं लवकर जुळतं तीतक्याच लवकर मोडत आहेत. त्यासाठी काही गोष्टी जिम्मेदार आहेत असे म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या म्हणजे जबरदस्तीने लग्न करणे , फक्त कुंडली बघून लग्न करणे पण दोघांच्या मधला समजूतदारपणा कोण बघतच नाही पण आताच्या काळात हे सुद्धा महत्त्वाचे आहे असं नाही का वाटत कोणाला ?

लग्न म्हणजे साधी आणि उरकुन टाकायची गोष्ट आहे का? घर पैसा नोकरी बघण्या सोबतच विचार व आवडीनिवडी जुळून येणे किंवा जुळवून घेण्याचा समजूतदारपणा असणे ही मुलाची किंवा मुलीची अपेक्षा आजकाल वाढतच चालले आहे म्हणजे एका दृष्टीने बरच आहे कारण लग्न म्हणजे जीवणातील एक गोड वळण असतं आणि ते आयुष्यभर सुःखाने घालवावं हे प्रत्येकाला वाटतं आणि नवरा बायकोचं नातं हे दोन तीन वर्ष नाही तर आयुष्यभर सुःख समाधानाने ते घालवावं असच वाटतं ना प्रत्येकाला?

पण त्यासाठी विचार पुर्वक निर्णय किंवा जोपर्यंत खात्री होत नाही कि हा मुलगा योग्य आहे किंवा ही मुलगी योग्य आहे हे कोणाशी चौकशी न करता स्वतःच किंवा दोन्ही कुटूंबातील व्यक्तींचे गेट टुगेदर झाले तर त्यात शंका कुशंका यांचे सर्वांसमक्षच निरसन होईल. यामुळे नंतर जो धोका असतो तो कदाचित आपण टाळू शकतो. लोक काय म्हणतील ? समाज काय म्हणेल हा विचार अजिबात करु नका कारण उध्वस्त होणारं आयुष्य तुमचं आहे आणि योग्य अयोग्य सुद्धा तुम्ही आणि तुमच्या कुटूंबानेच ठरवलेलं बरं नाही का ?

तुम्हाला वाटत असेल कि कुटूंबाचा गेट टुगेदर कशासाठी ? पण याला कारणही तसच आहे कारण माझ्या जवळच्याच एकट्याने सांगीतले कि मुलींच्या बाजुने मुलाची चौकशी केली अगदी कसून हं…… त्याच्या मित्रांशी चौकशी केली….. गावा मध्ये काही ओळखीत माणसांशी बोलले…… परत आपल्या पाहुणे पैकीत सुद्धा विचारपूस केली तेव्हा सर्वांनी एकच सांगीतलं कि मुलगा सद्गुणी आहे…. निर्व्यसनी आहे……. अमुक तमुक बरच काही सांगीतले. आणि लग्न ठरलं आणि झालं सुद्धा……..

पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हळूहळू कळत गेलं असं काही जे लग्न जुळवणीत सांगीतले नाहीत, असं काही उघड होत गेलं, आणि सारं बिघडत गेलं आणि एक वर्ष पुर्ण न होताच न घडावं ती वेळ येऊन पोहचली आणि ती म्हणजे

Divorce………..

अशी कितीतरी उदाहरणे आपण ऐकतो… बोलतो…. वाचतो….. आणि गप्प बसतो.

पण कोण असेल याला जबाबदार ? जबाबदार कोणी आणि का ? याबद्दल समाज मात्र कोणाच्या माथ्यावर खापर फोडेल हे मी सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही…..

कोमल हुद्दार

बिघडलं कुठे…..?

आजची पिढी स्वच्छंदी स्वतंत्र विचार वृत्ती करणारी झाली आहे. यांना सर्वकाही मनासारखं झालं पाहिजे. मुख्यत्वे लग्नासाठी स्वतंत्रपणे निवड करु पाहतात आणि ते कुठेतरी योग्यच आहे कारण हल्ली डिवॉर्सचे प्रमाण खुपच वाढलेले आहे तर दुसऱ्या लग्नासाठी संख्या वाढत आहे. पण पहिले ते पहिलेच असतं ना? कारण पहिल्या लग्नात जखमा खाऊन दुसरं लग्न करताना विचार करालच ना? असो…..!

आपली भारतीय संस्कृती योग्यच आहे कि योग्य वयानुसार योग्य वेळेत लग्न झाली पाहिजेत. पण आताच्या शैक्षणिक जगात लग्न सुद्धा खुप अभ्यासून घेत आहेत. कारण लग्न जेवढं लवकर जुळतं तीतक्याच लवकर मोडत आहेत. त्यासाठी काही गोष्टी जिम्मेदार आहेत असे म्हंटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्या म्हणजे जबरदस्तीने लग्न करणे , फक्त कुंडली बघून लग्न करणे पण दोघांच्या मधला समजूतदारपणा कोण बघतच नाही पण आताच्या काळात हे सुद्धा महत्त्वाचे आहे असं नाही का वाटत कोणाला ?

लग्न म्हणजे साधी आणि उरकुन टाकायची गोष्ट आहे का? घर पैसा नोकरी बघण्या सोबतच विचार व आवडीनिवडी जुळून येणे किंवा जुळवून घेण्याचा समजूतदारपणा असणे ही मुलाची किंवा मुलीची अपेक्षा आजकाल वाढतच चालले आहे म्हणजे एका दृष्टीने बरच आहे कारण लग्न म्हणजे जीवणातील एक गोड वळण असतं आणि ते आयुष्यभर सुःखाने घालवावं हे प्रत्येकाला वाटतं आणि नवरा बायकोचं नातं हे दोन तीन वर्ष नाही तर आयुष्यभर सुःख समाधानाने ते घालवावं असच वाटतं ना प्रत्येकाला?

पण त्यासाठी विचार पुर्वक निर्णय किंवा जोपर्यंत खात्री होत नाही कि हा मुलगा योग्य आहे किंवा ही मुलगी योग्य आहे हे कोणाशी चौकशी न करता स्वतःच किंवा दोन्ही कुटूंबातील व्यक्तींचे गेट टुगेदर झाले तर त्यात शंका कुशंका यांचे सर्वांसमक्षच निरसन होईल. यामुळे नंतर जो धोका असतो तो कदाचित आपण टाळू शकतो.